खुशखबर | इलेक्ट्रिक बाईकच्या किमतीत मोठी कपात

अनेक कंपन्या त्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री वाढवण्यासाठी भरघोस सूट देत आहेत. या यादीत एकामागून एक नवीन नावे जोडली जात आहेत. याआधी ओलाने व्हॅलेंटाइन डे ऑफर सुरू केली होती. तर iVooMe नेदेखील आपल्या ई-वाहनावर 31 मार्चपर्यंत ऑफर आणली आहे.
यातच आता बेंगळुरू येथील ईव्ही उत्पादक कंपनी बाऊन्स इन्फिनिटीही आपल्या इलेक्ट्रिक बाईकवर मोठी सूट जाहीर केली आहे. कंपनीने आपल्या Infinity E1+ इलेक्ट्रिक बाईकची किंमत 24,000 रुपयांनी कमी केली आहे.
या कपातीनंतर इलेक्ट्रिक बाईकची नवीन एक्स-शोरूम किंमत 113,000 रुपयांवरून 89,999 रुपयांवर आली आहे. याच्या नवीन किमतीही तत्काळ प्रभावाने लागू झाल्या आहेत. इन्फिनिटी E1+ इलेक्ट्रिक बाईकवरील ही ऑफर 31 मार्चपर्यंत वैध असेल. Bounce Infinity E1+ इलेक्ट्रिक बाईकला 2.2kW ची इलेक्ट्रिक मोटर मिळते. जी 65 kmph चा टॉप स्पीड देते. स्कूटर 2kWh लिथियम-आयन NMC बॅटरी पॅकसह येते. जी एका चार्जवर 85 किमी पेक्षा जास्त IDC रेंज देते.