क्राईम

हॉटेलमध्ये महिला प्रियकरासोबत आलेली रंगात…

  • उत्तर प्रदेशातील बागमध्ये एका महिलेने पोलिसांच्या भीतीने थेट छतावरून उडी मारत पळ काढला आहे. याचे ठोस कारण आता समोर आले आहे. महिला आपल्या प्रियकरासोबत एका हॉटेलमध्ये आली होती. अशावेळी तिचा पतीही त्याच ठिकाणी पोलिसांसह पोहोचला होता. आपला नवरा पोलिसांसोबत असल्याचे पाहून तिने छतावरून उडी मारली आणि तिथून पळ काढला. महिलेने छतावर उडी मारतानाचा व्हिडिओ एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला असून सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
  • संबंधित चर्चेत असलेले प्रकरण बरौत येथील कोतवाली भागातील आहे. महिलेच्या पतीने पोलिसांसोबत तिला रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न केला असता महिलेने थेट एका घराच्या छतावर उडी मारली आणि घटनास्थळावरून पळ काढला. प्रारंभी ही महिला बागपातच्या बरौत येथे पोहोचली आणि नंतर ती तिच्या प्रियकरासोबत हॉटेल हॉलिडेमध्ये पोहोचली. 
  • महिलेचा पती अगदी शांतपणे तिचा पाठलाग करायचा. 112 या क्रमांकावर फोन लावून पोलिसांना सतत बोलावत होता. पोलीस हॉटेलमध्ये पोहोचताच, महिलेनं भीतीच्या पोटी घराच्या छतावर 12-13 फुट उंचीवरून उडी घेतली. घटनास्थळावरून आता पुढील कारवाई केली जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. व्हायरल व्हिडिओच्या आधारे पुढील कारवाई केली जात आहे.

Related Articles

Back to top button