क्राईम

लग्न करण्यास नकार!

  • छावा संघटनेच्या नेत्याची गळा चिरून हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी अवघ्या चार दिवसांत मृत्यूचे गूढही उलगडले आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. 
  • सचिन पुंडलिक औताडे (वय ३२) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूलच्या छावा संघटनेचे ते शहर प्रमुख होते. सचिन यांचा प्रेमसंबंधातील अडथळ्यामुळे गळा चिरून हत्या करण्यात आल्याचे तपासादरम्यान उघड झाले आहे. अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करून याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील एक महिलेसह तिच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.
  • सचिन हे ३१ जुलैपासून बेपत्ता असल्याची तक्रार हर्सूल पोलिस ठाण्यात दाखल होती. १२ ऑगस्ट रोजी त्यांचा मृतदेह आढळून आला, तेव्हा शेवगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केल्यावर हा खुनाचा प्रकार असल्याचे समोर आले. पोलिसांच्या तपासात समोर आले की, प्रेमसंबंधातील अडथळ्यामुळे सचिनचा खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी बुलढाणा येथून दुर्गेश मदन तिवारी आणि भारती रवींद्र दुबे यांच्यासह आणखी एकाला ताब्यात घेतले आहे.
  • तिवारी आणि भारती यांनी ३१ जुलै रोजी सचिनला बोलावून घेतले आणि त्यांच्या प्रेमसंबंधातील वादामुळे अफरोज खान याच्या मदतीने चाकूने गळा चिरून खून केला. मयत सचिन याने प्रेयसीसोबत लग्न करण्यास नकार दिला होता. याच कारणातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Related Articles

Back to top button