क्राईम

48 वर्षीय मोहिनी वाघ, मुलाच्या मित्रासोबत अनैतिक संबंध

आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी काल मोहिनी वाघला अटक केली. त्यानंतर पुणे पोलिसांनी याबाबतची अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मोहिनी यांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

अक्षय जावळकर आणि मोहिनी यांचे प्रेमसंबध होते. त्यामुळे सतीश वाघ यांच्याकडून मोहिनी हिला सातत्याने मारहाण होत होती. वाघ दारूच्या नशेत मोहिनीला मारायचे. तसेच मोहिनीला पैशांचे सगळे व्यवहार आपल्या हाती घ्यायचे होते. त्यामुळेच ही हत्या करण्यात आली. मोहिनीने सतीश यांचा काटा काढण्यासाठी एकूण पाच लाख रुपयांची सुपारी दिली होती. हत्येच्या 15 दिवस आधीच कट रचला होता.

मोहिनी ही 48 वर्षाची आहे. तर अक्षय हा 32 वर्षाचा आहे. अक्षय हा मोहिनीच्या मुलाचा मित्र आहे. अक्षय हा पूर्वी वाघ यांच्याकडे भाडेकरू म्हणून राहत होता. तिथेच त्याचे मोहिनीशी प्रेम संबंध जुळले. सतीश यांना या अनैतिक संबंधाची कुणकुण लागली. त्यामुळे त्यांच्यात वाद होऊ लागले.

सतीश यांच्याकडून मोहिनीला मारहाण होत होती. त्यामुळे मोहिनी प्रचंड वैतागली होती. त्यामुळेच सतीश हे आपल्या प्रेमसंबंधात अडसर होत असल्याने मोहिनी आणि अक्षयने त्यांचा काटा काढायचा ठरवले. त्यानुसार दोघांनी खतरनाक प्लानिंग आखले आणि सतीश यांचे अपहरण करून त्यांची हत्या घडवून आणली. दरम्यान, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Back to top button