सोलापूर

ब्रेकिंग! सोलापूर! पोलीस रात्र गस्त घालत असताना…

सोलापूर (प्रतिनिधी) देशी गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या आरोपीस शहर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून गावठी पिस्तुल जप्त केली आहे.
१ फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखेचे स.पो.नि संजय क्षिरसागर व त्यांचे तपास पथक शहर हद्दीत रात्र गस्त करीत असताना गोपनीय माहिती नुसार, एका इसमाकडे देशी बनावटीचे गावठी पिस्तूल असून, तो सध्या सिध्दारूढ मठ, गवळी वस्ती, सोलापूर याठिकाणी थांबला आहे, अशी माहिती मिळाली. त्यावेळी सापळा रचून माहिती घेतली असता, तेथे एक इसम आढळून आला. त्याच्याकडे चौकशी केली असता, तो अल्पवयीन बालक असल्याचे दिसुन आले. दोन महिन्यापूर्वी त्याने नाशिक येथे राहणारा अभिजीत शाम पवार याचे मार्फतीने प्रशांत अशोक जाधव (रा.नाशिक) याचेकडुन, एक गावठी पिस्तुल खरेदी केली होते. ते पिस्तुल त्यांनी प्रथमेश व्यंकटेश करणकोट (वय-२३,रा.शरण बसवेश्वर नगर,गवळी वस्ती, सोलापूर) यास विक्री केले असून, सध्या ते गावठी पिस्तुल, इसम नामे प्रथमेश व्यंकटेश करणकोट याने स्वतःचे ताब्यात ठेवली असल्याची माहीती सांगितली.
याप्रकरणी प्रथमेश करणकोट याच्या ताब्यातून पथकाने गावठी पिस्तुल जप्त केले आहे. एम.आय.डी.सी पोलीस ठाणे, सोलापूर शहर यांनी गुन्हा दाखल करण्यात आला केला असुन, पुढील तपास एम.आय.डी.सी.पोलीस ठाणे करीत आहे.

Related Articles

Back to top button