क्राईम

हुंड्यासाठी पतीचा कांड

अलीकडे हुंडाबळीचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहे. आजही मुलींचा हुंड्यासाठी छळ केला जात आहे. अशीच एक दुर्दैवी घटना वाशिम जिल्ह्यातील वाघजाळी गावात घडली आहे. मेघा शिंदे या नवविवाहितेची हुंड्यासाठी तिच्याच पतीने गळा चिरून हत्या केलाचा प्रकार उघडकीस आला आहे. काही महिन्याअगोदर वाशिम जिल्ह्यातील चिखली बु. गावातील मेघाचा विवाह वाघजाळी येथील गजानन शिंदे या तरुणाशी झाला होता. मात्र, लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी माहेरून चारचाकी गाडीसाठी पैसे आणण्यासाठी पतीने मेघाकडे तगादा लावला. तसेच मेघाचा शारीरिक आणि मानसिक छळ केला.
दरम्यान मेघा आणि तिच्या सासरच्या कुटुंबियांमध्ये कायम वाद होत राहिला. मेघा आपल्या पती, सासू, सासऱ्यासह शेतात गेली असता तिथ पुन्हा त्यांच्यात पैशांवरून वाद झाला.
सासू, सासरे आणि पती यांनी मिळून मेघाची गळा चिरत हत्या केली. या घटनेनंतर पती गजाननने देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मेघाच्या माहेरच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दिली असून या प्रकरणी पती, सासू आणि सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button