राजकीय

ब्रेकिंग! धनंजय मुंडे राजीनामा देणार? अजितदादांसोबत सव्वा तास बैठक

  • मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यातच आज मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली असून तब्बल दोन तास पडद्यामागे चर्चा झाली आहे. याबाबत मुडे यांनी मात्र माध्यमांसमोर कोणतीही माहिती दिली नाही. नववर्षाच्या अजितदादा पवारांनी शुभेच्छा दिल्याचे त्यांनी सांगितले. या चर्चेमध्ये कोणताही राजकीय विषय नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
  • देशमुख हत्याप्रकरणी राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणामुळे मुंडे अडचणीत सापडले असून त्यांचे कथित साथीदार वाल्मिक कराड यांची सीआयडी चौकशी सुरू आहे. या प्रकरणी सातत्याने नवनवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होऊन तीन आठवडे उलटले तरी पालकमंत्री ठरलेले नाहीत. तिन्ही पक्षांतील अंतर्गत रस्सीखेचमुळे पालकंत्रीपदावर शिक्कामोर्तब होत नसल्याचे समजते. या संपूर्ण पार्श्वभूमीवर आज मुंडे यांनी अजितदादा यांची भेट घेतली आहे.

Related Articles

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet