महाराष्ट्र

गाजर दाखवून आदिवासी कोळी जमातीला फसवले?

भारतीय जनता पक्षाने 2014 मध्ये सत्तेत येण्याआधी आदिवासी कोळी महादेव मल्हार ढोर टोकरे समाजाला सरसकट दाखले देण्याचे गाजर दाखवले, दहा वर्षे सत्ता भोगली. पण ते हे आश्वासन पाळू शकले नाहीत आरक्षणाचे प्रश्न तरी होत चालले आहेत आणि समाज समाजात आणणे लावण्याचे काम भाजपने सुरू केले आहे.

त्यांचा हा सर्व परिणाम आहे, आज या सर्व समाजामध्ये भाजपा शिवसेना राष्ट्रवादी विरोधात प्रचंड मोठा आक्रोश आहे. पण सरकारला जन भावना समजत नाही. केंद्रातील व राज्यातील भाजप राष्ट्रवादी शिवसेना सरकार आंधळे बहिरे व बधिर आहे. जळगाव मधील आदिवासी कोळी जमाती उपोषणकर्त्यांकडे जाणून-बुजून दुर्लक्ष केले जाते.
सरसकट एसटीचे प्रमाणपत्र आदिवासी कोळी जमात बांधवांना देण्याचे आदेश लवकरात लवकर काढा. धनगर विरुद्ध आदिवासी असा वाद सत्ताधारी जाणीवपूर्वक निर्माण करून पहात आहेत. महाराष्ट्रात सत्ता आल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत आदिवासी कोळी समाजाला सरसकट जातीचे दाखले देण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.
आज नऊ वर्षे झाली काय झाले त्या आश्वासनाचे सत्ता द्या एका महिन्यात आदिवासी कोळी समाजाला न्याय देऊ, अशी गर्जना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीच केली होती. पुन्हा सत्तेत येऊन दीड वर्षे झाली. फडणवीसाना त्याचा विसर पडला या सरकारने फसवणूक केली आहे. जर आपण आठ दिवसात प्रश्न मार्गी नाही लावला तर येणाऱ्या कार्तिकी वारीला कुठल्याही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व नेत्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश करू देणार नाही. यंदा वारी आदिवासी कोळी समाजाची भरेल. जर वारीला यायचं असेल तर आदिवासी कोळी समाजाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा अन्यथा महाराष्ट्र तीव्र आंदोलन करू. हे सरकार घालल्याशिवाय आदिवासी कोळी समाज स्वस्त बसणार नाही, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अरविंद नाईकवाडी कोळी यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.
 

Related Articles

Back to top button