क्राईम

बॉयफ्रेंडच्या प्रेमात सोनम नवऱ्यासोबत बनली बेवफा

  • लग्नाला अजून एक महिना झाला नव्हता आणि त्या आधीच नवऱ्याचा बळी गेला. हनिमूनसाठी गेलेल्या राजाचा मृत्यू त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा विश्वासघात ठरला. राजा रघुवंशी हत्या प्रकरणात एक नवा आणि धक्कादायक तपशील समोर आला आहे. पत्नी सोनमचे आपल्या कंपनीतील मॅनेजर राज कुशवाहसोबत प्रेमसंबंध होते आणि याच लव्ह अफेअरमुळे बिचाऱ्या राजाचा जीव गेला.
  • राजा रघुवंशी हनिमूनसाठी काश्मीरला जायला उत्सुक होता. पण पत्नी सोनमने हट्टाने मेघालयला जाण्याचा निर्णय घेतला. केवळ जाण्याचे तिकीट बुक केले गेले, परतीचे नाही. यावरूनच ही योजना पूर्वनियोजित असल्याचा संशय पोलीस व्यक्त करत आहेत.
  • 17 दिवस बेपत्ता असलेल्या सोनमने अखेर गाजीपूरमधील नंदगंज पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. तपासादरम्यान इंदूर आणि मेघालय पोलिसांनी एक मोठा कट उघडकीस आणला.
  • सोनम आपल्या वडिलांच्या फॅक्टरीत एचआर म्हणून काम करत होती, तर राज तिथे मॅनेजर होता. दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. राजच या हत्येचा मास्टरमाइंड असून त्याच्यासह विक्की ठाकूर आणि आनंद यांनाही अटक करण्यात आली आहे.
  • पोलिसांच्या माहितीनुसार, राजावर पहिला हल्ला आनंदने केला. त्यानंतर इतर दोघांनी मिळून राजाची निर्घृण हत्या केली. गाझीपूर पोलिसांच्या इनपुटमुळे इंदूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

Related Articles

Back to top button