क्राईम

तुनिषानंतर आणखी एका स्टारने उचलले टोकाचे पाऊल

काही दिवसांपूर्वी 20 वर्षीय अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली. या दरम्यान आणखी एका 22 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची बातमी आहे. छत्तीसगढ येथील लीना नागवंशी असे या तरुणीचे नाव आहे. लीना इंस्टाग्रामवरीलर प्रसिद्ध इन्फ्लुएंजर होती. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असायची. शिवाय विविध फोटो आणि रिल्स देखील शेअर करायची.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री एक वाजता त्यांना ही सूचना मिळाली की, लीनाने नावाच्या तरुणीने फास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचायच्या आधी तिच्या घरच्यांनी तिचा मृतदेह खाली काढला. दरम्यान, लीनाने कोणतेही पत्र लिहिलेले सापडले नाही. तसेच तिचे कोणासोबत वाद नसल्याचे तिच्या घरच्यांनी सांगितले. मृत्यूच्या 3 दिवस आधी लीनाने इंस्टाग्रामवर रिल्स देखील शेअर केले होते. ज्यात ती खूप आनंदी दिसत होती.

Related Articles

Back to top button