महाराष्ट्र
पुण्यात कॅम्प परिसरातील अनाथ आश्रमाला आग; १०० चिमुकली बचावली

पुण्यात कॅम्प परिसरातील तय्यबीया अनाथ आश्रमाला आग लागली. ही आग रात्री १२.४१ च्या सुमारास लागली. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. या घटनेत १०० मुले थोडक्यात बाचावली. अग्निशामक दलाला याची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचत त्यांनी मुलांना सुखरूप बाहेर काढले.
तसेच आगीवर नियंत्रण मिळवल्याने दुर्घटना टळली. कॅम्प परिसरात ईस्ट स्ट्रीट मार्गावरील तय्यबीया अनाथ मुलांचे आश्रम आहे. या आश्रमाला रात्री १२.४५ च्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली.
त्यानुसार अग्निशामक दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहचले. महानगरपालिका आणि मुख्यालयातील एक अग्निशमन वाहन व देवदूत वाहन तसेच पुणे कॅन्टोमेंट अग्निशमन वाहन घटनास्थळी रवाना करण्यात आले.