सोलापूर

सानिया मिर्झा बनणार देशातील पहिली ‘मुस्लिम महिला फायटर पायलट’

सानिया मिर्झा देशाची पहिली मुस्लिम महिला फायटर पायलट बनणार आहे, तिच्या कुटुंबीयांना तिने केलेल्या अप्रतिम कार्याचा अभिमान आहे, तिने एनडीए परीक्षेत उत्कृष्ट रँक मिळवला आहे. सानियाने एनडीए परीक्षेत 149 वा क्रमांक पटकावला.सानियाने हे यश मिळवून ती 27 डिसेंबरला पुण्यात दाखल होणार आहे. एनडीएच्या परीक्षेत 400 जागा होत्या, त्यापैकी दोन जागा लढाऊ वैमानिकांसाठी होत्या.

सानिया उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील रहिवासी आहे. सानियाचे वडील एक टीव्ही मेकॅनिक आहेत. त्यांनी आपल्या मुलीला मोठ्या मेहनतीने शिकवले. सानियानेही हे मान्य केले आणि एनडीएची परीक्षा उत्तीर्ण होऊन ती भारतीय हवाई दलातील देशातील पहिली मुस्लिम फायटर पायलट बनणार आहे.

Related Articles

Back to top button