क्राईम

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत भाजप पदाधिकाऱ्याची हत्या

  • ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत आणि दिवाळी सणाच्या काळात पुणे जिल्ह्यात तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पवन मावळ विभागात भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याने खळबळ माजली आहे.
  • काल सकाळी (प्रभाचीवाडी) महागाव ता.मावळ येथे ही घटना उघडकीस आली. निलेश दत्तात्रय कडू (वय 30 रा.सावंतवाडी, महागाव ता.मावळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मयत निलेश हा भाजप विद्यार्थी आघाडीचा पदाधिकारी होता.
  • लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभाचीवाडी महागाव हद्दीत अज्ञात व्यक्तींनी निलेश यांचा दगडाने ठेचून खून करून फरार झाले. ही घटना गुरुवारी रात्री घडली असून काल उघडकीस आली आहे.
  • या घटनेची माहिती मिळताच लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मायने, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ व पोलीस अंमलदारांनी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रवाना केला. दरम्यान यातील काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.

Related Articles

Back to top button