महाराष्ट्र

BREAKING! गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान दगडफेक

लावणी डान्सर गौतमी पाटील दिवसेंदिवस चर्चेत येत आहे. गौतमीचे नाव आता प्रत्येक घराघरात पोहोचले आहे. तिच्या कार्यक्रमांना युवा वर्गाची प्रचंड गर्दी होताना दिसत आहे. काहीवेळा तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊन पोलिसांना बोलवण्याची वेळ आली.

असाच काहीसा प्रकार बीडमध्ये झाला आहे. आपल्या मादक अदांनी तरुणांना घायाळ करणार्‍या गौतमीच्या कार्यक्रमाप्रसंगी तुफान दगडफेक झाल्याची माहिती समोर येत आहे. बीड शहरानजीक बीड-परळी राष्ट्रीय महामार्गालगत राजुरी शिवारात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रोहन गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमीच्या लावणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान गौतमीला पाहाण्यासाठी चाहते आऊट ऑफ कंट्रोल झाले.

कार्यक्रमासाठी तरुणांची झुंबड उडाली होती. या कार्यक्रमात दोन ठसकेबाज लावण्या झाल्यानंतर तरुणांचा संयम सुटला आणि ते स्टेजवरच चढले. यादरम्यान मोठा गोंधळ झाला. स्टेजवर दगडफेक झाल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने गौतमी सुखरुप आहे. मात्र, या घडलेल्या प्रकारामुळे चालू कार्यक्रम बंद करण्याची नामुस्की आयोजकांवर ओढवली. याशिवाय या गोंधळामुळे सुमारे एक तास ट्रॅफीक जॅम झाले होते.

Related Articles

Back to top button