सोलापूर
ब्रेकिंग! सोलापुरात यंदाच्या हंगामातील सर्वात उच्चांकी तापमान

-
राज्यात एप्रिल महिन्यातच मे सारखी स्थिती जाणवणार आहे. पुढचे चार दिवस हवामानात मोठे बदल होणार असून तापमान 42 ते 45 डिग्रीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात कडक उन्हाळा जाणवत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावरील वाहतूक कमी झाली आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान सोलापुरात आज यंदाच्या हंगामातील सर्वात उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. आज सोलापुरात 43.2 अंश इतके तापमान होते.



