क्राईम
दिल्ली पुन्हा हादरली; बारावीच्या विद्यार्थिनीवर अॅसिड हल्ला

दिल्लीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी एका अल्पवयीन मुलीवर अॅसिड हल्ला झाला आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मोहन गार्डन परिसरातील घडली. 17 वर्षीय मुलगी आपल्या लहान बहिणीसोबत जात होती. तेव्हा समोरुन आलेल्या बाईकस्वारांनी अॅसिड हल्ला केला. हल्ला केल्यावर आरोपींनी पळ काढला.
या हल्ल्यात पीडित मुलगी जखमी झाली असून तिला उपचारासाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडित मुलीच्या बहिणीने दोन ओळखीच्या व्यक्तींवर संशय व्यक्त केला आहे. यापैकी एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता दिल्ली महिला आयोगाने पोलिसांना नोटीस जारी केली आहे.



