Pathaan : भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे दीपिका ट्रोल

Admin
1 Min Read

शाहरुखचा ‘पठाण’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातील गाणे बेशरम रंग प्रदर्शित होताच सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये होते. या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादूकोणचा सिझिलिंग लूक पाहायला मिळाला. शाहरुख आणि दीपिकामधील केमिस्ट्री सर्वांना आवडली आहे. पण आता या गाण्यावर आणि दीपिकाच्या कपड्यांवर टीका होत आहे.

या गाण्यातील दीपिकाच्या हॉट लूकने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. दरम्यान, गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी घातल्यामुळे तिच्यावर टीका केली जात आहे. एका यूजरने ट्वीट करत, ‘पठाण चित्रपटात अभिनेत्रीला भगव्या रंगाचा पोशाष परिधान करण्यास दिला आहे आणि गाण्याचे नाव बेशरम रंग असे ठेवण्यात आले आहे’ असे म्हटले आहे. दुसऱ्या एका यूजरने, या पॉर्नसाठी बॉलिवूडने भगवा रंगाची निवड केली, या आशयाचे ट्वीट करत गाण्यावर टीका केली आहे.

Share This Article