महाराष्ट्र
राज ठाकरे हेच बाळासाहेबांचे खरे वारसदार, त्यांच्याकडे सत्ता आल्यास…

कोकण दौऱ्याला निघालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे काल आणि आज दोन दिवस कोल्हापूरमध्ये थांबले होते. त्यांनी आज सकाळी श्री करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेत आपल्या कोकण दौऱ्याला सुरुवात केली.
मात्र कोकण दौऱ्याला निघण्यापूर्वी त्यांनी इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी पवार यांच्याशी जवळपास अर्धा तास विविध मुद्द्यांवर चर्चा केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि अन्य ऐतिहासिक बाबींवर चर्चा करत त्यांनी चित्रपटात सुरू असलेल्या इतिहासाबाबत देखील चर्चा करत तुम्हीच खरे बाळासाहेबांचे वारसदार, असे म्हणत डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी राज यांचे कौतुक केले.
पवार म्हणाले, राज यांना इतिहासाबाबत प्रचंड आस्था आहे. लोकांना खरा इतिहास माहिती व्हावा हा त्यांचा प्रयत्न असतो.
मात्र, अनेक चित्रपटांमध्ये चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवला जात असून ‘वेडात वीर मराठी दौडले सात’ याबाबत चर्चा झाली असून सोबत छत्रपती ताराराणी यांचे ग्रंथ भेट देत एका वेळेला माझ्याबद्दल बोलले नाही तरी चालेल मात्र ताराराणी यांच्यावर बोला, असा आग्रह त्यांनी राज यांना केला.