सोलापूर

एकच नंबर! सोलापूरची कन्या बनली सेल टॅक्स ऑफिसर

वडिलांचा टूर अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय. आई ग्रहिणी. दोन छोटे भाऊ. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून जॉब करण्यापेक्षा प्रशासकीय सेवा करण्यात अधिक रुची. एमपीएससीचा अभ्यास करत असतानाच मेहनतीच्या बळावर सेल टॅक्स अधिकारी झाली.मी या यशावर समाधानी नाही अजून खूप मोठे स्वप्न साकार करायचे असे विचार व्यक्त करणारी धाडसी, हुशार , चाणाक्ष जुळे सोलपुरातील जानकी नगरातील कुमारी पूजा राजू राठोड .

सांगलीतल्या वालचंद कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण करताना कॅम्पस जॉबला महत्व न देता सामान्य लोकांच्या हितासाठी प्रशासकीय सेवा करण्याचा चंग बांधलेल्या पूजाने पहिल्याच प्रयत्नांत एसटीआय यशस्वी झाली .
पूजाच्या घरी जाऊन विशाल गायकवाड व उद्योजक विजय पवार यांनी सत्कार केला. आई वडिलांचे ही तिच्या यशात योगदान असल्याचे पूजा भरभरून बोलत होती. त्यांचेही मनापासून कौतुक केले .

Related Articles

Back to top button