छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेखातून अपमान

Admin
1 Min Read

राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या हसन मुश्रीफ फाउंडेशन या संस्थेने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केला आहे.
सोशल मीडियामध्ये सध्या एका सराव परीक्षेची प्रश्नपत्रिका फिरत आहे. ही प्रश्नपत्रिका पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती सराव चाचणी – २ वर्ष २०२०-२१ ची आहे.

मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने ही सराव परीक्षा घेण्यात आली होती. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते आणि त्यामध्ये मुश्रीफ कॅबिनेट मंत्री होते. या फाउंडेशनच्या प्रश्नपत्रिकेत दोन प्रश्न विचारण्यात आले, त्यातील पहिला प्रश्न असा होता की, कासीमभाईंनी त्यांचे घर दलाला मार्फत ९,५०,००० रुपयांत विकले. त्यांना त्याबद्दल ३ टक्के दलाली द्यावी लागली. तर घर विकून त्यांना किती रुपये मिळाले?.
या प्रश्नाच्या खालीच दुसरा प्रश्न विचारण्यात आला. त्यामध्ये असे म्हटले की, जर संभाजीचा पगार शिवाजीपेक्षा साडेबारा टक्क्यांनी जास्त असल्यास शिवाजीचा पगार संभाजीपेक्षा शेकडा कितीने कमी आहे?
पहिल्या प्रश्नामध्ये मुसलमान व्यक्तीचा नामोल्लेख कासीमभाई असा करत या फाउंडेशनने आदर दिला आहे. परंतु त्याचवेळी दुसऱ्या प्रश्नात मात्र महाराष्ट्रासाठी आदर्श असणारे छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी यांचा नामोल्लेख असलेल्या व्यक्तींचा उल्लेख एकेरी करून महाराष्ट्र द्वेष दाखवून दिला आहे.

Share This Article