क्राईम

पुन्हा भीषण अपघात; कारच्या टायरने घेतला पाच विद्यार्थ्यांचा जीव

अलीकडे सोलापूरसह सर्वत्र अपघाताचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान नाशिक जिल्यातील सिन्नर येथील मोहदरी घाटात भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

चार जण जखमी झाले आहेत. नाशिक येथील कॉलेजात शिकणारे विद्यार्थी स्विफ्ट कारने मित्राच्या लग्नासाठी गेले होते. संगमनेरहून लग्न सोहळा पार पाडून ते परतत होते. संध्याकाळी स्विफ्ट कार मोहदरी घाटावर आली. त्याच वेळेस कारचा टायर फुटल्याने कार लेन ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका वाहनांवर आदळली. स्विफ्ट कारमधील विद्यार्थी हे आपल्या मित्राच्या लग्नाला गेले होते.
लग्नाचा कार्यक्रम पार पाडून परताना हा अपघात झाला. मोहदरी घाटावर कार आली असताना  भरधाव वेगात असलेल्या स्विफ्ट कारचे टायर फुटले आणि हा अपघात घडला.
टायर फुटल्याने चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि स्विफ्ट कार लेन ओलांडून विरुद्ध दिशेला गेली.
समोरुन येणाऱ्या वाहनांना या कारने जोरदार धडक दिली. समोरुन येणारी स्विफ्ट कार आणि इनोव्हा कार यांना धडक बसल्याने तिन्ही गाड्याचे नुकसान झाले. या अपघातात पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

Related Articles

Back to top button