क्राईम

गुजरात-हिमाचल आणि दिल्लीत कोण जिंकणार?

देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी आफताब पुनावालाच्या चौकशीत धक्कादायक खुलासे झाले आहे. पोलिसांनी कोर्टाच्या संमतीने आफताबच्या पाच पॉलिग्राफ टेस्ट आणि एक नार्को टेस्ट केली असून त्यात आफताबने श्रद्धाच्या हत्येचा घटनाक्रम सांगितला.
पोलिसांनी या प्रकरणात अजून कुणाकुणाचा सहभाग आहे, याचा तपास करायला सुरुवात केली असून त्यातच आता दिल्लीतील तिहाड जेलमध्ये बंद असलेल्या आफताबने विचारलेल्या एका प्रश्नामुळे पोलिस हैराण झाले आहेत.
आफताबने पोलिसांना गुजरात, हिमाचल आणि दिल्लीतील एमसीडी निवडणुकीत कुणाचा विजय होणार? असा प्रश्न विचारला आहे. त्याने तिन्ही निवडणुकीत रस दाखवला असून याबाबतची काही माहिती वाचण्यासाठी वर्तमानपत्र आणून देण्याची विनंती सुरक्षा रक्षकांना केली आहे. त्यामुळे आता श्रद्धा हत्याकांड प्रकरणात आफताबला राजकीय नेत्याने मदत केली असल्याची शंका उपस्थित होत आहे.

Related Articles

Back to top button