राजकीय

ब्रेकींग! गुजरातमध्ये पुन्हा भाजपचा डंका?

गुजरात, हिमाचल प्रदेशमध्ये मतदान  प्रक्रिया पार पडली असून आता सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे. जनतेला आता ८ डिसेंबरची प्रतीक्षा आहे. मात्र निकालापूर्वीच एक्झिट पोल येण्यास सुरूवात झाली आहे.
मतदानोत्तर चाचण्यांमध्ये गुजरातमध्ये भाजपला विक्रमी विजय मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दिल्ली महापालिकेसाठी आलेल्या एक्झिट पोलमध्ये आम आदमी पार्टी मोठा विजय मिळवणार असल्याचे सांगितले जात आहे.  एबीपी न्यूजच्या एक्झिट पोलनुसार  दक्षिण गुजरातच्या ३५ जागांपैकी भाजपला २४ ते २८ जागा मिळू शकतात.
दिल्ली यूनिवर्सिटीने पहिला एक्झिट पोल जाहीर केला त्यामध्ये भाजपला मोठा विजय मिळाला आहे. एक्झिट पोलनुसार, गुजरातच्या १८२ विधानसभा जागांपैकी तब्बल १६७ जागांवर भाजप बाजी मारू शकते. तर केवळ चार जागांपर्यंत काँग्रेस मर्यादित राहू शकते.

Related Articles

Back to top button