महाराष्ट्र
महाराष्ट्राचे मंत्री कर्नाटकात आल्यास त्यांच्यावर जबर कारवाई

सीमाभागात घडलेल्या काही घडामोडी आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानांमुळे सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. बसवराज बोम्मई यांनी सोलापूर, अक्कलकोटसह महाराष्ट्रातील ४० गावांवर दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई बेळगाव दौऱ्यावर जाणार होते; परंतु ते आता उद्या बेळगाव दौऱ्यावर जाणार आहेत.
अशातच बोम्मई यांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांना पुन्हा एकदा इशारा दिला आहे. ते आज बंगळूरू येथे बोलत होते. दोन राज्यातील सीमा प्रश्न केव्हाच संपला आहे. तुमच्या आक्षेपांवरचा वाद सुप्रीम कोर्टात सुरू आहे. तेथे लढू. इथे येऊन राज्याची शांतता व सुव्यवस्था बिघडवू नका, असा इशाराच बोम्मई यांनी दिला आहे. इशारा दिल्यानंतरही महाराष्ट्राचे मंत्री कर्नाटकात आल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशा सूचना बोम्मई यांनी कर्नाटक पोलिसांना दिल्या.
आम्ही आधीच मुख्य सचिवांद्वारे पत्र पाठवले आहे. मंत्र्यांनी बेळगावात येण्यासाठी ही योग्य वेळ नाही. यामुळे कायदा व सुव्यवस्था भंग होऊ शकते. देशात कुणालाही कुठेही फिरण्याची मुभा आहे; परंतु सध्याची वेळ योग्य नाही.
आम्ही आधीच मुख्य सचिवांद्वारे पत्र पाठवले आहे. मंत्र्यांनी बेळगावात येण्यासाठी ही योग्य वेळ नाही. यामुळे कायदा व सुव्यवस्था भंग होऊ शकते. देशात कुणालाही कुठेही फिरण्याची मुभा आहे; परंतु सध्याची वेळ योग्य नाही.
शांतता राखण्यासाठी आम्हाला काही निर्णय घ्यावे लागत आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, तुमच्या मंत्र्यांना इथे पाठवू नका. आमच्या मते, सीमाप्रश्न आधीच संपला आहे. आता आपण सुप्रीम कोर्टातच लढू. जेणेकरून दोन्ही राज्यांतील नागरिकांचे संबंध तितकेच सौहार्दाचे राहतील, असे आवाहन बोम्मई यांनी केले.