मीडियासमोर आमने सामने या ; तुमची चिरफाडच करतो

वेदांत फॉक्सकॉनसह महाराष्ट्राबाहेर गेल्या गेलेल्या प्रकल्पावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. यात ठाकरे गट शिंदे गटावर टीका करण्यात आघाडीवर आहे. दरम्यान शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा खुलं आव्हान दिलं आहे.
महाराष्ट्रातून जे प्रकल्प बाहेर गेले त्याविषयी चर्चा करण्यासाठी शिंदेंनी प्रसारमाध्यमांसमोर चर्चेला यावे. दोघं एकत्र चर्चेला सामोरं जाऊ, असं चॅलेंज आदित्य यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. आदित्य यांनी आज पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर अनेक आरोप केले आहेत. आदित्य म्हणाले की, मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना आज चॅलेंज देतो कारण मला इतरांकडून उत्तर अपेक्षित नाही. त्यामुळे मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना पुन्हा चॅलेंज देतो की, मीडियासमोर माझ्यासोबत वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पाविषयी चर्चा करायला या. यावर आता शिंदे काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



