खेळ

ब्रेकिंग! किंग कोहली क्रिकेटमधून होणार निवृत्त ?

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये त्याची कामगिरी मोलाची ठरली. पाकिस्तान विरुद्ध त्याची खेळी चांगलीच गाजली. दरम्यान विराटने काल एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना धक्का दिला आहे. त्याच्या खेळीमुळे भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला.

भारताने ही स्पर्धा जिंकली नसली तरी  विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांचा खेळ जबरदस्त झाला. दरम्यान विराटने काल केलेल्या एका पोस्टमुळे एक चर्चा रंगली आहे. त्याच्या पोस्टमुळे विराट क्रिकेटमधून निवृत्त होणार का, असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित होत आहे. काल विराटने एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना धक्का दिला आहे.
त्याने पाकिस्तान विरुद्ध खेळलेल्या इनिंगची आठवण करून देत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो बॅटसह पॅव्हेलियनमध्ये परतताना दिसत आहे. त्याची ही पोस्ट सध्या गाजत आहे. तो निवृत्त होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याच्या या पोस्टमुळे चाहते घाबरले आहेत. दरम्यान दोनच वर्षांपूर्वी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अशाप्रकारेच निवृत्ती जाहीर केली होती.  

Related Articles

Back to top button