महाराष्ट्र

ब्रेकिंग! CM पदावरुन भाजपचे पुन्हा धक्कातंत्र?

  1. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याचे उत्तर अजून मिळालेले नाही. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. तर दुसरीकडे भाजपाने जोरात हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपाकडून मुख्यमंत्रि‍पदासाठी देवेंद्र फडणवीस हेच सर्वात प्रबळ दावेदार मानले जात आहेत. परंतु, त्यांच्याऐवजी दुसरा एखादा मुख्यमंत्री दिला तर, याचीही शक्यता पडताळून पाहिली जात आहे. याच अनुषंगाने काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची चर्चा झाली. तसेच आज राजधानी दिल्लीत होणाऱ्या बैठकीत या मुद्द्यावर निर्णय होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. शिंदे यांनी माघार घेतल्यानंतर मुख्यमंत्रि‍पदासाठी फडणवीसांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा आहे. परंतु, बिगर मराठा चेहरा दिल्यास याचा मराठा मतांवर परिणाम काय परिणाम होऊ शकतो याची चाचपणी तावडे आणि शहा यांच्या बैठकीत झाल्याची माहिती आहे.
  2. राज्याचा मुख्यमंत्री कोण यावर चर्चा करण्यासाठी आज राजधानी दिल्लीत महत्वाची बैठक होणार आहे. सध्या तरी फडणवीसांचाच दावा प्रबळ मानला जात आहे. मात्र तरी देखील ऐनवेळी दुसरेच नाव समोर येईल का, अशी शंकाही भाजपा कार्यकर्त्यांच्या मनात आहे. 

Related Articles

Back to top button