- नोव्हेंबर 2024 च्या विधानसभा निवडणुकीपासून राज्यात 14.71 लाख नवीन मतदारांची भर पडली आहे तर 4.09 लाख मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत परंतु एकाही राजकीय पक्षाने या संदर्भात कोणताही आक्षेप घेतलेला नाही, असे राज्य निवडणूक आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
- जिल्हानिहाय आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की ठाणे येथे सर्वाधिक 2.25 लाख नवीन मतदारांची वाढ झाली आहे, त्यानंतर पुण्यात 1.82 लाख नवीन मतदारांची वाढ झाली आहे. यामुळे ठाण्यातील मतदारांची संख्या 74.55 लाख आणि पुण्यातील मतदारांची संख्या 90.32 लाखांवर पोहोचली आहे.
- मतदार यादीत फेरफार केल्याच्या आरोपांनी राजकीय वाद उफाळून आला असला तरीही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर 14 लाखांहून अधिक नावे जोडल्याबद्दल आम्हाला आतापर्यंत एकही लेखी तक्रार किंवा आक्षेप मिळालेला नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीसाठी तयार केलेल्या यादीऐवजी आता अद्ययावत यादीचा वापर आगामी नागरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी केला जाईल, असे ते म्हणाले.
राज्यात 14 लाख नव्या मतदारांची भर, चार लाख नावे वगळली