महाराष्ट्र
ज्या पक्षात सुषमा अंधारे, त्या पक्षाला मतदान नाहीच

ज्या पक्षात शिवसेना नेत्या सुषमा अंधारे राहतील, त्या पक्षाला मतदान न करण्याची शपथ विश्व वारकरी सेनेने गंगासागर येथे घेतली आहे. अंधारे या हिंदू धर्मियांच्या देव देवतांबद्दल बोलतानाचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे वारकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
उद्धव ठाकरे यांनी अंधारे यांची त्वरित पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी केली आहे. राज्यातील वारक-यांना शपथ देऊन अंधारे ज्या पक्षात जातील, त्या पक्षाला मतदान न करण्याचे म्हटले आहे.
आगामी काळात राज्यातील वारकरीदेखील अशी शपथ घेतील, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आगामी काळात अंधारे व वारकरी संघटना यांच्यात संघर्ष बघायला मिळू शकतो.



