मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आपल्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण आणि कायद्याच्या चौकटीत सुरू आहे. सरकार जरी गरीब लोकांकडे दुर्लक्ष करत असेल, तरी न्यायव्यवस्था नक्कीच न्याय देईल. तसेच मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असे देखील जरांगे यांनी स्पष्ट केले.
जर सरकारने आमच्या विरोधात अन्याय करण्याचा प्रयत्न केला, तरी आम्ही आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. सातारा आणि हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. मराठा आणि कुणबी एकच आहे, त्याच्या जीआर शिवाय मुंबईतून जाणार नाही, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.
मी मेलो तरी आझाद मैदानातून हटणार नाही. त्यानंतरचे दुष्पपरिणाम सरकार बघून घेईल. मागण्या मान्य होण्यासाठी कुठल्याही थराला जायचे झाले तर मी मागे हटणार नाही. मराठे काय असतात ही साडे तीनशे वर्षांनंतर पाहायचे असेल, तर माझा नाईलाज आहे, असा थेट इशारा जरांगे यांनी दिला.