महाराष्ट्र

ब्रेकिंग! मराठा आंदोलकांचा शेअर मार्केटसमोर राडा!

  • मुंबईतील आझाद मैदानात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्या या मागणीसाठी आंदोलन सुरु केले आहे. त्यांना साथ देण्यासाठी लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. आतापर्यंत सरकार आणि आंदोलकांमध्ये काही तोडगा निघालेला नाही. तर दुसरीकडे एक मोठी बातमी समोर आली आहे.
  • या बातमीनुसार, मराठा आंदोलकांनी नजर चुकवून शेअर मार्केटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आरक्षणासाठी सुरु असणारा आंदोलन आता चिघळले आहे का? अशी चर्चा जोराने सुरु झाली आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, काही आंदोलकांनी आज सकाळी शेअर मार्केट इमारतीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना अडवल्याने मोठा अनर्थ टळला. तर दुसरीकडे काही आंदोलकांनी बेस्टची बस देखील अडवण्याचा प्रयत्न केला होता.
  • काल जरांगे यांनी आंदोलकांना आवाहन करत मुंबईकरांना त्रास होणार नाही, असे आंदोलन करा, असे आवाहन केले होते. मात्र काही आंदोलकांकडून नको त्या गोष्टी करण्यात येत आहे. त्यामुळे आता जरांगे आंदोलनाबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Back to top button