महाराष्ट्र

ब्रेकिंग! गळ्यात भगवे गमछे, CSMT परिसरात चोरी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर सुरु केलेल्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे.

दरम्यान, या आंदोलनाच्या गर्दीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फोर्ट परिसरातील दादाजी स्ट्रीट येथे काही आंदोलक तरुणांनी गळ्यात भगवे गमछे घालून कपड्यांच्या दुकानात चोरी केल्याची माहिती उघड झाली आहे. माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेत स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश करण्यात आला. त्यानंतर दुकानातील काही कपडे आणि रोकड चोरून नेण्यात आली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

या घटनेनंतर तक्रारदाराने पोलिसांत फिर्याद दाखल केली असून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. इतकेच नव्हे, तर तक्रारदाराने ही बाब सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (माजी ट्विटर) वर टाकून थेट मुख्यमंत्री आणि मुंबई पोलिस आयुक्तांना टॅग करून लक्ष वेधले आहे. जरांगे यांच्या उपोषणाला समाजाकडून मोठा लोक समर्थन मिळत आहे, असे असताना काही टवाळखोर तरुणांच्या अशा कृतीमुळे आंदोलनाला गालबोट लागत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Related Articles

Back to top button