क्राईम
स्पीड ब्रेकरचा अंदाज आला नाही

- राज्यातील रस्त्याच्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असून आत्तापर्यंत अवजड वाहनांमुळे अपघात होत होते. हे अपघात होऊ नयेत म्हणून जे स्पीड ब्रेकर तयार केले, त्यावरून देखील एक अपघात झाला आहे. रात्री दहाच्या सुमारास रस्त्यावर गतिरोधकाचा अंदाज न आल्याने दुचाकी डिव्हायडरला धडकली आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका युवतीचा यात मृत्यू झाला.
- बारामती भिगवण रस्त्यावर ऊर्जा भवननजीक हा अपघात काल रात्री साडेदहाच्या दरम्यान घडला. या घटनेत शरयू संजय मोरे या 22 वर्षीय वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला.
- शरयू ही तिच्या एका मैत्रिणीसह दुचाकीवरून काल रात्री बारामतीतून एमआयडीसी परिसरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वस्तीगृहाकडे निघाली होती. भिगवण रस्त्यावरील ऊर्जाभवन नजीक तिची दुचाकी आली असता गतिरोधकाचा अंदाज तिला आला नाही आणि तिची दुचाकी डिव्हायडरला धडकली. यात दुचाकी चालवणाऱ्या शरयूचा जागीच मृत्यू झाला तर तिची दुसरी मैत्रीण जखमी झाली.



