क्राईम
दारुच्या नशेत परप्रांतीयाकडून राज ठाकरेंना शिवीगाळ

- मुंबईतील अंधेरी परिसरात राहणारा सुजीत दुबे या व्यक्तीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात त्याने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह विधान केले आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत अंधेरीतील सुंदर नगर परिसरातील दुबेच्या वॉशिंग सेंटरवर तोडफोड केली.
- पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी सुजीत याला अटक केली आहे. दरम्यान, मनसे कार्यकर्त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, दुबेचे वॉशिंग सेंटर हे अनधिकृत असून त्यातून अमली पदार्थांची देवाणघेवाण होत असल्याचा संशय आहे.
- तोडफोडीनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महाराष्ट्रात राहून कोणीही राज ठाकरे यांच्याविरोधात अपमानास्पद भाषा वापरली, तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे.



