ब्रेकिंग! सूरत, इंदुरनंतर ओडिसामध्ये मोठा गेम

सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे रणधुमाळी दिसत आहे. विविध राजकीय पक्षांकडून प्रचारांना वेग आला आहे. आरोप – प्रत्यारोप केले जात आहेत. परिणामी निवडणुकीतील रंगत आणखी वाढली आहे. लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आता मंगळवारी मतदान होणार आहे. दरम्यान, सुरत, इंदूर लोकसभेच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्यानंतर काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. काँग्रेस पक्षाच्या पुरी मतदारसंघाच्या उमेदवार सुचारिता मोहंती यांनी निवडणुक लढण्यास नकार दिला आहे. पक्षाकडून निवडणुक लढवण्यासाठी निधी मिळत नसल्याची तक्रार करत सुचारिता यांनी तिकीट पक्षाकडे परत केले आहे. त्यामुळे काँग्रेसला तगडा झटका बसला आहे.
ओडिशातील पुरीमध्ये काँग्रेस उमेदवार सुचरिता यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. पक्षाकडून कोणतीही आर्थिक मदत केली जात नसल्याचा आरोप सुचरिता यांनी केला आहे. पक्षाच्या निधीशिवाय निवडणूक प्रचार करणे मला शक्य नाही. त्यामुळे मी निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. मी तिकीट परत करत आहे, असे सुचरिता यांनी स्पष्ट केले आहे.