सोलापूर

ब्रेकिंग! सोलापुरात संभाजी ब्रिगेड आक्रमक

  • संभाजी ब्रिगेड सोलापूरच्यावतीने निवेदन सादर करण्यात येते की, सोलापुर शहर व हद्दवाढ भागामध्ये महानगरपालिका प्रशासनाच्या नियोजना अभावी पाण्याच्या अनियमित पुरवठ्यामुळे पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली असून शहरात व हद्दवाढ भागात स्वागत नगर, देसाई नगर, समाधान नगर, जुळे सोलापूर, आदींसह विविध भागत पाण्याच्या अनियमितपणामुळे लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली असून या परिसरात पाच-सहा दिवसा आड रात्री अपरात्री करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. 75 वर्ष होऊन सुद्धा पाण्यासारखा मूलभूत प्रश्न महानगरपालिका सोडवू शकली नाही हे मोठे दुर्दैव सोलापूर वाशीयांचे आहे. याबाबत आपण सोलापूर मनपा आयुक्त यांनी जातीने लक्ष देऊन सोलापूर शहरासह हद्दवाढ भागातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करावेत.
  • शहरातील हद्दवाढ भागामध्ये पाणी पुरवठ्याच्या प्रश्न अत्यंत गंभीर असून याकडे महानगरपालिका प्रशासनाचे कसलेही नियोजन नाही पाण्याचे वितरण करतानाही दुजाभाव केला जात आहे काही भागात दोन दिवसा आड पाणी तर काही भागात सात आठ दिवसा आड पाणी येत आहे. महापालिका अधिकाऱ्यांना याबाबत कोणतेच गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही काही ठिकाणी दूषित पाण्यामुळे आरोग्याच्या समस्याही निर्माण झाल्या आहेत अनेक नागरिकांचे बळी सुद्धा गेली आहेत तरी दूषित पाणीपुरवठा सुरूच आहे
  • महानगरपालिका नागरिकाकडून 365 दिवसाचे पाणीपट्टी आकारणी करते व प्रत्यक्ष 90 दिवसाचे पाणीपुरवठा करते त्यामुळे जेवढे दिवस पाणी तेवढेच बिल आकारणी करावी अनेक भागात अंतर्गत जलवाहिनी चार इंची असल्यामुळे पाणीपुरवठा कमी दाबाने होतो काही भागात असलेले हातपंप नादुरुस्त झाल्यामुळे बंद आहेत तर काही भागात नव्याने हातपंप बसवणे अत्यंत गरजेचे आहे.
  • एक हजार कोटी रुपये खर्चून सुद्धा उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण होऊन देखील दोन-तीन दिवसाआड पाणी देण्याचे आश्वासन महानगरपालिका देऊ शकत नाही. याचाच अर्थ भविष्यात देखील हद्दवट भागाला पाच-सहा दिवसा अडच पाणीपुरवठा होईल असे दिसून येत आहे. त्यामुळे पाणी प्रश्न सारखा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपण योग्य नियोजन लावून मार्गी लावावा ही विनंती अन्यथा भविष्यात महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात पाहण्यासाठी वेगवेगळी उग्र आंदोलने करावी लागतील याचा आपण गंभीर त्यांनी विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
  • पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, संभाजी ब्रिगेड महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मिनल दास, महानगर अध्यक्ष शिरीष जगदाळे, जिल्हाध्यक्ष वकील आघाडी गणेश कदम, अरविंद शेळके, प्रशांत देशमुख, सिद्धराम सावळे, दिलीप निंबाळकर, सतीश बावरे, रमेश चव्हाण, प्रशांत भंडारे, अथर्व धोत्रे, रमेश भंडारे, तेजस शेळके, महेश भंडारे, सचिन होनमाने, फिरोज सय्यद, रमेश चव्हाण, राजेंद्र माने, संजीवनी सलबत्ते, जयश्री जाधव,माधुरी चव्हाण,मनिषा कोळी,सुनीता, घंटे,मैनाबाई साळुंके,सुनीता साळुंखे,नीलम पाटील,श्वेता कुलकर्णी,शुभांगी कुलकर्णी, भारती गुन्नाल, जया भुजंग,अन्नपूर्णा पाटील,मीना पाटील,ताराबाई कोकाटे,गौरी दिवाणजी, रेणुका जाधव, वैशाली डिगे,सुनीता नागटिळक,सुजाता घाटगे, शोभा देसाई, भाग्यश्री वाघमोडे, सुनंदा सूर्यवंशी, सुनीता कारंडे, शिवम्मा चलगेरी, रुक्मिणी चिल्लाल आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button