क्राईम

ब्रेकिंग! राज्यात मध्यरात्री मोठी दुर्घटना

  • राज्यात गेल्या काही दिवसापासून सोलापूरसह अन्य भागात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान आज राज्यात मध्यरात्री मोठी दुर्घटना घडली आहे. मुंबईतील विक्रोळी पार्क साईट येथील वर्षा नगरमधील जनकल्याण सोसायटीजवळ आज मध्यरात्री भूस्खलनाची घटना घडली. ही घटना पहाटे 02 वाजून 39 मिनिट वाजता घडल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेत एका झोपडीवर टेकडीवरून माती आणि दगडांचा ढिगारा कोसळला. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. 
  • या घटनेची माहिती मिळताच तात्काळ मुंबई अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक वॉर्ड कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
  • त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. या घटनेत चार जण जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये शालू मिश्रा (19 वर्षे) आणि सुरेश मिश्रा ( वय 50) असं मृत वडील-मुलीचे नाव असून आरती मिश्रा आणि ऋतुराज मिश्रा या दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत.

Related Articles

Back to top button