क्राईम

मैत्रिणीने हॉस्टेलच्या रूममधील खिडकीतून आत डोकावले अन् बसला धक्का

  • कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील गर्ल्स हॉस्टेलमध्ये एका युवतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गायत्री पंढरीनाथ रेळेकर (वय २१) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. नैराश्यातून गायत्रीने टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
  • राजारामपुरी पोलिस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे. पण गायत्रीने टोकाचे पाऊल का उचलले? असा सवाल विचारला जात आहे.
  • गायत्री हॉस्टेलच्या रुम नंबर 54 मध्ये दोन मैत्रिणींसोबत राहत होती. रक्षाबंधनानिमित्त गायत्री गावाला गेली होती. त्यानंतर सोमवारी ती हॉस्टेलवर परत आली. हॉस्टेलवर आल्यानंतर तिने बॅग ठेवली अन् वडिलांना फोन करून सुखरुप पोहोचल्याचे सांगितले. रुममध्ये कुणी नसताना आतून कडी लावून घेतली आणि गळफास लावून घेतला. दुपारी दोनच्या सुमारास जेव्हा गायत्रीची रुममेट परत आली, तेव्हा तिने दरवाजा वाजवला पण गायत्रीने दरवाजा उघडला नाही. मैत्रिण दरवाजा उघडत नसल्याचे लक्षात येताच तिने खिडकीतून आत डोकावल्यानंतर धक्काच बसला. गायत्री पंख्याला लटकलेली दिसल्यावर तिने सुरक्षा कर्मचाऱ्यांना बोलवले. दरम्यान, वसतिगृह अधीक्षकांनी दरवाजा तोडला अन् तातडीने पोलिसांना बोलवले. पोलिस सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

Related Articles

Back to top button