क्राईम

तरुणीला कारमध्ये खेचले, तीन नराधमांकडून रात्रभर अत्याचार

  • पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात एका 23 वर्षीय स्थानिक तरुणीवर धावत्या कारमध्ये सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली असून या प्रकरणी तीन अज्ञात तरुणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे लोणावळ्यासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
  • पीडित तरुणी शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास कामावरून घरी पायी जात असताना कारमधून आलेल्या तीन अज्ञातांनी तरुणीला एकटी जातांना पाहिले. दरम्यान, 25 ते 30 वयोगटातील आरोपी नराधमांनी तरुणीला अडवले. तरुणीला पाहून आरोपींची नजर फिरली. त्यांनी तिचे तोंड दाबून, हात बांधून तिला गाडीत जबरदस्तीने बसवले. त्यानंतर तिला मारहाण करून तिचा मोबाईलही काढून घेतला.
  • आरोपींनी तरुणीवर धावत्या गाडीत सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर एका निर्जन ठिकाणी कार थांबवून तिच्यावर अनेकवेळेस अमानुषपणे अत्याचार करण्यात आला. नंतर तिला नांगरगाव परिसरात सोडून आरोपींनी पळ काढला.
  • दरम्यान पीडित तरुणीने घडला प्रकार घरी सांगितला आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिची वैद्यकीय तपासणी केली. या तपासणीनंतर पोलिसांनी तीन अज्ञात आरोपींविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी तातडीने तपासकार्य सुरू केले आहे. पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Back to top button