क्राईम

अंकिताने केले प्रेम प्रकरण…

राज्यात धक्कादायक वृत्त हाती आले आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगरमध्ये आई – वडिलांनी पोटच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्यांनी १७ वर्षीय लेकीला विळ्याने वार करून हत्या केली आहे. या प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात आई-वडिलांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्हयातील हिमायतनगर येथे ही घटना घडली. परजातीय मुलासोबत पळून गेलेली मुलगी परत घरी आली. पण तिने त्या मुलाशी लग्न करण्याचा हट्ट मुलीने धरला. याच कारणामुळे मुलीच्या आई-वडिलांनी आपल्याच पोटच्या मुलीची हत्या केली आहे.
दरम्यान नांदेडच्या हिमायतनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या अंकिताचे एका मुलावर प्रेम होते. ती त्याच्यासोबत घर सोडून पळून गेली होती. काही दिवसानंतर ती पु्न्हा घरी आली. मुलगी घर सोडून पळून गेल्याने घरचे खूप चिडले होते. घरी आलेल्या मुलीने त्या मुलाशी लग्न करण्याचा हट्ट आई-वडिलांकडे धरला. त्यानंतर आई-वडिलांनी रागाच्या भरात लेकीचा संपवण्याचा कट रचला. ती झोपेत असताना आई-वडिलांनी तिच्यावर विळ्याने वार केले. या हल्ल्यात १७ वर्षीय अंकिताचा मृत्यू झाला.

Related Articles

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa