सोलापूर
ब्रेकिंग! प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणात मराठा संघटना आक्रमक, अक्कलकोट पोलिसांवर राजकीय दबाव?

- संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमध्ये काळं फासण्यात आल्याची घटना रविवारी घडली होती.
- दरम्यान या प्रकरणात मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपींना मोक्का लावला पाहिजे, अशी मागणी या संघटनांनी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास शुक्रवारी 18 जुलै रोजी अक्कलकोट बंदचा इशारा त्यांनी दिला आहे.
- या प्रकरणातील आरोपी तीन दिवस अक्कलकोटला मुक्कामी होते. त्यांना मोक्का लावावा, अशी मागणी या संघटनांनी केली आहे. अक्कलकोट पोलिसांवर राजकीय दबाव होता, असा आरोप या संघटनांनी केला आहे.
- याबाबत बुधवारी उद्या अक्कलकोटमध्ये मराठा समाजाची बैठक होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.



