क्राईम
जिस दिन मारुंगा, छाती पे मारुंगा, स्टेटस ठेवला आणि तसाच मर्डर!

- गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. दररोज कुठे ना कुठेतरी गुन्हे घडतात. अशातच राज्यातील एक शहर काल दुपारी रक्तरंजित घटनेने हादरून गेले. यामुळे खळबळ उडाली आहे. तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहराच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात भरदिवसा दोन अज्ञात हल्लेखोरांनी २६ वर्षीय आकाश कैलास मोरे याच्यावर गावठी कट्ट्याने तब्बल १२ गोळ्या झाडत निर्घृण हत्या केली. वाळू व्यवसायातील वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
- आकाश याच्या शरीरावर इतक्या गोळ्या झाडण्यात आल्या की त्याची अक्षरशः चाळण झाली. हत्या होण्याआधी दोन दिवस आधी आकाश याने आपल्या सोशल मीडियावर एक स्टेटस व्हिडीओ टाकला होता. त्यामध्ये असे लिहिले होते की, शेठ, तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही थेट छातीवर मारतो, रोखठोक. जिस दिन मारुंगा छाती पे मारुंगा. या स्टेटसनंतर काहीच तासांत झालेल्या या हल्ल्यामुळे वर्चस्ववाद आणि सोशल मीडियावरील वैरभावना ही या हत्या मागचे कारण असू शकते, असा पोलिसांचा संशय आहे.
- या हत्येनंतर मुख्य आरोपी नीलेश अनिल सोनवणे आणि त्याचा अल्पवयीन साथीदार हे बाईकवरून जळगावच्या दिशेने पळाले.
- मात्र पाठलाग होतोय, किंवा जीवाला धोका आहे, अशी शंका आल्याने त्यांनी थेट जामनेर पोलिस ठाण्याबाहेर येऊन आत्मसमर्पण केले. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते अत्यंत घाबरलेले होते आणि पोलिस स्टेशन कुठे आहे, अशी विचारणा करत उभे होते.



