सोलापूर! मागील भांडणावरून डोक्यात घातला कोयता

सोलापूर (प्रतिनिधी) मागील झालेल्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करत लोखंडी कोयता तरुणाच्या डोक्यात मारून जखमी केल्याची घटना १ डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास राजूरजी नगर येथे घडली. याप्रकरणी श्रीदत्त संतोष गुरव (वय- १९, रा.बुवा गल्ली, भूषण नगर) याने सलगर वस्ती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्याच्या फिर्यादीवरून नागेश परशुराम सोनेकर (रा.माहित नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी श्रीदत्त गुरव हा कामावरून घरी येत असताना नागेश याने श्रीदत्त याची मोटारसायकल अडवली व जुन्या भांड्याच्या कारणावरून शिवीगाळ करून तुला जास्त माज आला आहे का? आमच्याशी भांडण करतो असे म्हणून त्याच्या हातातील लोखंडी कोयत्याने श्रीदत्तच्या डोक्यात मारून जखमी केले आहे.असे फिर्यादीत नमूद आहे.पुढील तपास पोलीस नाईक जाधव हे करीत आहेत.



