क्राईम
30 वर्षीय पत्नीचे 55 वर्षीय प्रियकराशी अनैतिक संबंध

- विवाहबाह्य संबंधातून बायको आणि तिच्या प्रियकराची पतीने दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील तळवडे भागात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सध्या सुरु आहे.
- या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी आरोपी दत्तात्रय साबळेला बेड्या ठोकल्या आहेत. दत्तात्रय हा ठेकेदार आहे. मंगला सुरज टेंभरे ( वय 30 ) आणि जगन्नाथ पुंडलिक सरोदे (वय 55) अशी हत्या करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
- गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. याच विवाहबाह्य संबंधाची खात्री झाल्यानंतर आरोपी दत्तात्रयने दोघांची हत्या केली. तळवडे परिसरात दोघांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. मंगला या मृत महिलेचा याआधीही विवाह झालेला होता. त्यांना दोन मुले देखील आहेत.
- परंतु, पतीच्या मृत्यू पश्चात दत्तात्रय याच्याशी मंगलाने विवाह केला होता. दरम्यान मंगला हिचे जगन्नाथ याच्याशी विवाहबाह्य संबंध निर्माण झाले. या अनैतिक संबंधाची कुणकुण पती दत्तात्रयला लागली होती. अखेर दत्तात्रयने त्यांना पुराव्यासह पकडल्यानंतर त्यांची दगडाने ठेचून हत्या केली आहे. या घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.



