- भगिनींना आत्मनिर्भर करण्यासाठी दहिटणे रस्त्यावर स्वमालकीच्या जागेवर महिलांना स्वंयरोजगार गृह उद्योग केंद्र उभारणार – आमदार विजय देशमुख
- सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील प्रभाग ०१ व ०२ मधील भगिनींना गृह रोजगार मिळावा व आत्मनिर्भर होऊन सक्षम व्हावे यासाठी शेळगी येथील श्री नंदिकेश्वर मंदिर येथे गृह पापड उद्योग रोजगार व प्रशिक्षणाचा शुभारंभ आमदार विजय देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्रारंभी श्री नंदिकेश्वर मंदिरातील श्री महादेवांची मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
- आमदार विजय देशमुख यांच्या नेतृत्वात लक्ष्मी गृह पापड उद्योग यांच्या विद्दमाने गृह पापड उत्पादन प्रशिक्षणात ३०० पेक्षा अधिक महिलांनी नोंदणी करीत प्रशिक्षणासाठी सहभाग नोंदविला. श्री नंदिकेश्वर मंदिराच्या सभागृहात ०५ दिवसाचे प्रशिक्षण होत असून प्रशिक्षणानंतर महिलांना दररोज घरपोच पापड पीठ देऊन त्यांच्याकडून ३५ रुपये प्रति किलो दराने पगार देण्यात येणार आहे. यांमुळे सरासरी ०८ ते १० हजार रुपयांपर्यंत महिलांना घरबसल्या मासिक उत्पन्न मिळणार असल्याने माता भगिनी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
- आमदार विजय देशमुख, माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, लक्ष्मी गृह पापड उद्योगाचे सर्वेसर्वा राजेश डोंगरे, लक्ष्मी बंडगर, नगरसेवक डॉ. किरण देशमुख, माजी सभागृह नेते संजय कोळी, माजी नगरसेवक अविनाश पाटील, चंद्रकांत रमणशेट्टी, माजी नगरसेविका शालन शिंदे, कल्पना कारभारी,मल्लिनाथ कटप अशोक खानापुरे, व्यंकटेश खटके, , शिवलिंग शहाबादे, संजय कणके, शंकर शिंदे, ज्ञानेश्वर कारभारी, विरेश उंबरजे, अमोल बिराजदार आदींसह मोठ्या संख्येने प्रभाग ०१ व ०२ मधील जेष्ठ नागरिक, महिलांवर्गाची व भाजपा पदाधिकारींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
- आमदार विजय देशमुख यांनी महिला गृह रोजगार व प्रशिक्षण शिबिरास मार्गदर्शन करताना लाडकी बहिण योजनेतून दरमहा १५०० रुपये मिळतात त्यातही आमच्या भगिनी आनंदी आहेत. आता भगिनींना घरबसल्या पापड गृह उद्योगातून दरमहा ०८ ते १० हजार रुपये उत्पन्न मिळाल्यास माझ्या भगिनींचा आर्थिक विकास होत त्या सक्षम होण्याच्या दृष्टीने गृह पापड उद्योग प्रशिक्षण महत्वाचा ठरणार आहे. या प्रशिक्षणातील यशस्वी भगिनींना दहिटणे रस्त्यावरील स्वतःच्या जागेवर उद्योग उभारणीसाठी जागा उपलब्ध करून सुसज्ज महिला गृह रोजगारासाठी उद्योग केंद्राची निर्मिती करून देण्याचे अभिवचन आमदार विजय देशमुख यांनी दिले.
- भाजपा माजी शहाराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी आपल्या मार्गदर्शन मनोगतात बोलताना सद्द परिस्थिती ही पुरुषांसोबत महिलांनाही उद्योग करण्याची वेळ असल्याने हे गृह पापड रोजगार आपणास घरबसल्या उपलब्ध होणार असून या संधीचा फायदा सदर परिसरातील महिलांनी घ्यावे व सोबत आपल्या परिसरातील गरजू महिलांनाही यात सहभागी करावे व आपली कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारावी. आपण सक्षम व्हावे याकरिता प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करणारे लोकप्रिय आमदार विजय देशमुख यांसोबत डॉ. किरण देशमुख यांच्या टीमचे विशेष अभिनंदन करीत या विशेष महिला गृह रोजगार कार्यास शुभेच्छा दिल्या.
ब्रेकिंग! शेळगी, दहिटणेतील लाडक्या बहिणींना खुशखबर
