क्राईम
ट्रेनमध्ये महिलांची तुंबळ हाणामारी; रक्तबंबाळ होईपर्यंत मारले

- मुंब्रा रेल्वे स्थानकामध्ये लोकलमधील गर्दीने पाच प्रवाशांचे जीव गेल्याची घटना ताजी असतानाच लोकलमधील महिला प्रवाशांच्या तुंबळ मारहाणीचा व्हिडिओ वायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दोन महिला खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये दाराजवळच्या पॅसेजमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटत तुंबळ मारहाण करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
- यामध्ये एक महिला रक्तबंबाळ झाल्याचेही दिसत आहे. दरम्यान या दोघींना अन्य प्रवाशांनी एकमेकींपासून दूर केले.
- ही घटना चर्चगेटहून विरारला जाणाऱ्या लेडीज स्पेशल लोकलमध्ये घडली. संध्याकाळी ही लोकल चर्चगेटहून सुटली. त्यानंतर ती अंधेरी स्थानकात पोहोचली. यावेळी ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यावेळी चढणाऱ्या एका महिलेचा धक्का दुसऱ्या मुलीला लागला. त्यामुळे त्या दोघींमध्ये वाद झाला. तो वाद इतका टोकाला गेला की एकमेकींमध्ये हाणामारी झाली. एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या डोक्यात मोबाईलने हल्ला चढवला. त्यात दुसऱ्या महिलेचे डोकं फुटलं. त्यामुळे चवताळलेल्या दुसऱ्या महिलेने समोरच्या महिलेच्या झिंज्या उपटल्या. यामुळे एकच गोंधळ झाला.
- ज्यावेळी हा राडा सुरू होता, त्यावेळी त्याचा एक व्हिडीओ काढला गेला. हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियीवर व्हायर होत आहे. राडा वाढत गेल्याने पुढे लोकल भाईंदर इथं थांबली. त्यावेळी या दोन्ही महिलांना खाली उतरवण्यात आले. त्यांना आरपीएफने ताब्यात घेतले.
- त्यानंतर त्यांना भाईंदर रेल्वे पोलिस स्थानकात नेण्यात आले. त्यात ज्योती प्रसाद सिंह ही 21 वर्षाची तरूणी आणि कविता मेदडकर असे भांडण करण्याऱ्या महिलांची नावे आहेत. दोघीही नोकरी करतात. ज्योती ही नायगाव इथं राहाणारी आहे. तर कविता ही विरारला राहाणारी असल्याची माहिती चौकशीत समोर आली.
- त्यांची चौकशी केली असता गाडीत चढताना आमच्यात वाद झाला. त्यातून हाणामारी झाली आहे. पण आम्हाला एकमेकींविरोधात कोणतीही तक्रार द्यायची नाही, असे या दोघींनीही सांगितले. शिवाय आम्ही हे प्रकरण आपसात मिटवत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्याकडून त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.



