सोलापूर
ब्रेकिंग! सोलापुरात कर्णिक नगरमध्ये दुहेरी आत्महत्या

- सोलापूर शहरात आज दुपारी घडलेल्या धक्कादायक आत्महत्येच्या प्रकरणात कर्णिक
- नगर येथील एका घरामध्ये युवक युवतीने गळफास घेऊन आपापल्या जीवनाची अखेरची पायरी चढली आहे.
- रोहित भिमू ठणकेदार वय वर्ष 23 राहणार शांतीनगर मड्डी वस्ती सोलापूर असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
- आज दुपारी चारच्या सुमारास कर्णिक नगर येथील एका घराच्या पहिल्या मजल्यावर हॉलमध्ये छताला असलेल्या लोखंडी हुकला ओढणीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत तो मिळून आला.
- त्यास उपचारासाठी बेशुद्ध अवस्थेत पोलीस हवालदार गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय म्हणजेच सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता तो उपचारापूर्वीच मयत झाले असल्याची माहिती मिळाली आहे.
- दरम्यान याच घरात अश्विनी केशापुरे (वय वर्ष 23 मुक्काम पोस्ट शिरूर तालुका जिल्हा बागलकोट राहणार कर्नाटक) या युवतीने छताला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपल्याची घटना समोर आली आहे.
- सायंकाळी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार गायकवाड यांनी अश्विनी हिला बेशुद्ध अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असता ती उपचारापूर्वीच मृत झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.



