- सोलापूर लोकसभा मतदारसंघातील अत्यंत गरीब परिस्थिती असलेल्या रुग्णांना, गंभीर आजाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांना, दुर्धर आणि महागड्या आजाराच्या रुग्णांना उपचाराकरीता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येतेे. त्यांना औषधोपचाराकरीता लाखो रुपये खर्च येत असल्यामुळे त्यांना उपचाराकरीता अनेक अडचणी निर्माण होत असतात. सदर रुग्णांच्या नातेवाईकांनी खासदार प्रणिती शिंदे यांना भेटून निवेदन दिले होते.
- पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधीमधून औषधोपचाराकरीता आर्थिक मदत मिळण्याकरीता खासदार प्रणिती शिंदे यांनी सतत पाठपूरावा करून १) श्लोक सचिन गोरे ३,००,०००/- रुपये, २) दर्शन रवी यनगंदुल २,२५,०००/- रुपये
या दोन रुग्णांना एकूण ५,२५,०००/- (पाच लाख पंचवीस हजार) रुपये अर्थसहाय्य मिळवून दिले. महागड्या आजारांवरील गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक सहाय्य मिळाल्याने या कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे. त्याबद्दल रुग्णांच्या नातेवाइकांनी खासदार प्रणिती शिंदे यांचे आभार मानले.