क्राईम

ब्रेकिंग! पुण्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला

  • अहमदाबादमधील विमान दुर्घटनेच्या जखमा ताज्या असतानाच पुन्हा एक मोठी बातमी समोर आली. उत्तराखंडच्या केदारनाथ धाममध्ये पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली. आज केदारनाथ मार्गावर एक हेलिकॉप्टर कोसळले. यानंतर आता आणखी एक दुर्घटना घडली आहे. पुण्यात मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवर धक्कादायक घटना घडली आहे. या नदीवरील पूल अचानकपणे कोसळला. या दुर्घटनेत तब्बल 20 ते 25 जण वाहून गेले आहेत. आमदार सुनील शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
  • याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी ही घटना घडली आहे. मावळ तालुक्यात कुंडमळा हे प्रसिद्ध ठिकाण आहे. याठिकाणी पावसाळ्यात रोज अनेक पर्यटक भेट द्यायला येतात. कुंडमळा ओलांडण्यासाठी येथील इंद्रायणी नदीवर एक पूल बांधलेला आहे. हाच पूल आज कोसळला आहे. या दुर्घटनेत काही नदीत काही पर्यटक बुडाले होते. त्यातील काही पर्यटकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे.

Related Articles

Back to top button