क्राईम

खूपच वेदनादायी! संपूर्ण देश शोक सागरात बुडाला

  • एअर इंडियाच्या AI171 या प्रवासी विमानाचा आज दुपारी एक वाजून ३८ मिनिटांनी गुजरातच्या अहमदाबाद शहरात भीषण अपघात झाला. अहमदाबादहून लंडनकडे निघालेले हे विमान टेक ऑफनंतर काही मिनिटांतच रहिवासी भागात कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली.
  • या विमानात २३० प्रवासी आणि १२ केबिन क्रू सदस्य होते. प्राथमिक माहितीनुसार, सर्व २४२ जणांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
  • सुनील तटकरे यांच्या कुटुंबीयांचा समावेश या दुर्घटनेत महाराष्ट्रातील सहा जणांचाही समावेश होता. यामध्ये अपर्णा महाडिक, मैथिली पाटील आणि रोशनी सोनघरे या तीन महिला केबिन क्रूच्या रूपात कार्यरत होत्या, तर महादेव पवार, आशा पवार आणि मयुर पाटील हे प्रवासी होते. अपर्णा महाडिक या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांच्या नातेवाईक असून, त्या तटकरे यांच्या भाच्याच्या पत्नी आहेत. विशेष म्हणजे, अपर्णा यांचे पतीही एअर इंडियामध्ये कार्यरत आहेत.
  • या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विजय रुपाणी यांचाही समावेश होता. ते आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी लंडनला जात होते. त्यांची पत्नी लंडनमध्ये मुलीसोबत आधीच होती, तर मुलगा अमेरिकेहून कौटुंबिक कार्यक्रमासाठी लंडनमध्ये दाखल झाला होता. या घटनेमुळे राजकीय वर्तुळातही हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Back to top button